नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरा पासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या देवमोगरा पुनर्वसन गावाच्या शिवारात रात्री पासुन बिबट्या सापळ्यात अडकला आहे. यामुळे परिसरात एकच भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा शहरा पासून अवघ्या तीन किमी अंतरावर ठाणाविहीर व देवमोगरा पुनर्वसन शिवारात असलेल्या गव्हाच्या शेतात अज्ञाताने सापळा लावला होता.त्या ठिकाणी काल रात्रीच्या सुमारास बिबट्या या सापळ्यात अडकला आहे.

त्यामुळे रात्रीपासून ती विव्हळत आहे.त्यामुळे जोर जोरात डरकाळी फोडत आहे.त्यामुळे ठाणाविहीर व देवमोगरा पुनर्वसन शिवारात एकच भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले असून अद्याप त्यावर काही कारवाई झालेली नाहीय








