नंदुरबार l प्रतिनिधी
वराहांनी शेतीचा रस्ता धरल्याने शतकर्यांचे नुकसान वाढले असुन धडगांव तालुक्यातील हरणखुरी गावात वराहांचा हैदोस वाडल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
धडगाव शहरात उकिरडे,गटारी कमी झाल्याने बाजारातील वराहांनी धडगाव शहर सोडून थेट गावाकडे वाट धरल्याने शेतकर्यांच्या पिकाचे मोठे नुकसान करत आहे. खायचे कमी पण नुकसान जादा करायचे, अशी त्यांची खाद्यशैली असल्याने हरणखुरी गावातील शेतकरी त्रस्त झाले असून हिवाळी पिकांची राखण करायला रात्रभर जागरण करावे लागत असुन गावातील अनेक शेतकर्यांचे पिकांची नासाडी केली आहे.
धडगाव शहरापासून अवघ्या ३ किमी अंतरावर हरणखुरी गाव असल्याने डुकरांच्या नुकसानीला सर्वात जास्त शेतकर्याना सामोरे जावे लागत आहे. याबातीत वन खात्यातील अधिकार्यांशी संपर्क केला तर गावठी डुकरांनी केलेल्या नुकसानीला भरपाई देण्याची तरतूद वन खात्याकडे नाही. मात्र रानडुकरांनी नुकसान केले तर भरपाई मिळते अशी माहिती दिली जाते त्यामुळे शेतकर्यांनी कुणाकडे मदत मागावी असा प्रश्न पडला आहे.
त्यामुळे तालुका प्रशासनाने व धडगाव नगरपंचायतीने या डुकरांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी हरणखुरी ग्रामस्थ करत आहे.