नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीरात १२५ जणांची तपासणी करण्यात आली.
उमर्दे खुर्दे ता.नंदुरबार येथील श्री.विठ्ठल मंदिरात श्री.विठ्ठल मंदिर ट्रस्ट, हरिभक्त पारायण भजनी मंडळ, श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ, ग्रामपंचायत उमर्दे खुर्दे व परांडे हॉस्पिटल क्रिटीकल केअर व डायलिसीस सेंटर, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रसिद्ध तज्ञ डॉ. शिरीष मनमोहन परांडे (मराठे ) यांच्यासह विविध तज्ञ डॉक्टरांनी शिबीरात रक्तदाब, ई.सी.जी. रक्तातील साखर तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी हृदयरोग तज्ञ डॉक्टरांकडुन हृदयसंबंधी आजारांवर मोफत मार्गदर्शन करून गरजु रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले.या शिबरात १२५ नागरीकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यावेळी सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर साळुंखे, ग्रामसेवक भरत गुले,गोविंद साळुंखे, रमेश कुटे, रामभाऊ बेंद्रे, कृष्णा मराठे, जयंत गागरे, ऍड.दत्तात्रय कदमबांडे, वेडु जाधव. दगेसिंग राजपुत यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थीत होते.शिबीर यशस्वीतेसाठी श्री.विठठ्ल मंदिर ट्रस्ट, हरिभक्त पारायण भजनी मंडळ, श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ, ग्रामपंचायत व नवयुवक मंडळ उमर्दे यांनी परिश्रम घेतले.