नवापूर l प्रतिनिधी
बालविवाह प्रथा बंद होण्यासाठी सर्व शासकीय विभाग व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन काम करावे. विधवा प्रथा बंद व्हाव्या यासाठी ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी केले.नवापूर तालुक्यात आज तहसिल कार्यालयात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य श्रीमती दिपीका चव्हाण,श्रीमती उत्कर्षा रुपवते यांनी तालुक्याती वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत महिला विषयक प्रश्न,योजना,व इतर योजनाच्या आढावा घेतला.
सदर दौरा दरम्यान त्यांनी तहसिल कार्यालय येथे आढावा बैठक घेऊन घेऊन महिला विषयक प्रकरणाचा आढावा, महिला सुरक्षा बाबत सद्याची स्थिती,आय सी सी कमेटी,दक्षता समिती,वासल्स समिती,निर्भया पथक,उपजिल्हा रुग्णालय, समउपदेशन केंद्र इत्यादी योजनांची माहिती घेतली सदर बैठकीत तहसिलदार मंदार कुलकर्णी,नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी,सुरेखा जगताप,दिलीप कुलकर्णी,गटविकास अधिकारी सी के माळी,मुख्यधिकारी सप्निल मुधलवाडकर,बालविकास प्रकल्प अधिकारी,संजय कोडार,तालुका आरोग्य अधिकारी मनिषा वळवी,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी शशिकांत वसावे आदी उपस्थित होते.
सदर बैठकित कोरोना मध्ये विधवा महिला व एक पालक असलेल्या गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल यादृष्टीने नियोजन करावे हरविलेल्या महिला व मुली यांच्यासाठी सर्व शासकीय विभागाने एकत्र येऊन कार्य करावे .तसेच बालविवाह प्रथा बंद होण्यासाठी सर्व शासकीय विभाग व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन काम करावे. विधवा प्रथा बंद व्हाव्या यासाठी ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घ्यावा असे सुचित केले.तसेच ग्रामपंचायत मध्ये निवडुण आलेल्या महिला सरपंच व सदस्य यांना प्रशिक्षण देऊन त्यांना विविध महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना प्रोसाहीत करावे असा सुचना महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य श्रीमती दिपीका चव्हाण,श्रीमती उत्कर्षा रुपवते यांनी दिल्या.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी केला.
त्यानंतर त्यांनी नवापूर पोलिस स्टेशन येथे महिला तक्रार निवारण कक्षला भेट दिली.या प्रसंगी उपनिरीक्षक अशोक मोकळ,पो हे का निजाम पाडवी,नरेंद्र नाईक,रणजीत महाले, महिला तक्रार निवारण कक्षचा सदस्या माजी नगरसेविका मेघा जाधव,डॉ स्नेहल पाटील,लिला राठोड आदी उपस्थित होत्या यानंतर पंचायत समिती येथील बालविकास प्रकल्प कार्यालयात कार्यरत असलेले महिला समुपदेशन केंद्राला भेट देऊन त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन या नंतर नवापूर तालुक्यातील आदिवासी विकास विभागाचा कोळदा व बोरचक आश्रम शाळेला भेट दिली.