नंदुरबार l प्रतिनिधी
येथील वे.खा.भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित कमला नेहरू कन्या कनिष्ठ महाविद्यालय,नंदुरबार येथील विद्यार्थिनीचे 19 वर्ष मुली गटात *पिंपळनेर* येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय शालेय तेंग-सु-डो क्रीडा स्पर्धेत कु.खुशी सुधाकर देसलेnया खेळाडू विद्यार्थिनींने व्दितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल* प्राप्त केले.
यशस्वी विद्यार्थिनीला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती.स्मिता अजमेरा व प्राचार्या सौ.वंदना पाटील, उपप्राचार्य बी.सी पवार उपमुख्याध्यापक एस.एम.पाटील, पर्यवेक्षक डी.पी.राजपुत व एस.एन.चौधरी यांनी विद्यार्थिनीचे कौतुक व अभिनंदन केले.
तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.या यशस्वी विद्यार्थिनींला क्रीडा शिक्षक प्रा.दिनेश सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.








