नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील पन्हाळीपाडा येथे मुलबाळ होत नाही या कारणावरुन पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील पन्हाळीपाडा येथे मुलबाळ होत नाही. या कारणावरुन पती-पत्नीला मिठ्या काल्ला पावरा, वांगीबाई मिठ्या पावरा, पिंट्या मिठ्या पावरा यांनी काठी, हाताबुक्यांनी व विटेने मारहाण करुन दुखापत केली. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.दीपक वारुळे करीत आहेत.