Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मयत भिमसिंग तडवीचा अपघात नसून घातपात ? चौकशीची मागणी, पोलीस स्टेशन समोर उपोषण करण्याचा नातेवाईकांचा इशारा

team by team
February 3, 2023
in क्राईम
0
मयत भिमसिंग तडवीचा अपघात नसून घातपात ? चौकशीची मागणी, पोलीस स्टेशन समोर उपोषण करण्याचा नातेवाईकांचा इशारा
धडगाव  l  प्रतिनिधी
मागील आठवड्यात मोलगी येथील  निंबीपाडा ता. अक्कलकुवा येथे उमटी येथील भिमसिंग तडवी या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. परंतु हा अपघात नसल्याचे सांगत सखोल चौकशी करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी आदिवासी विकास मंत्री, पोलीस अधिक्षक,तहसिलदारांना  निवेदनाद्वारे केली आहे.
     निवेदनात  उमटी  ता. अक्कलकुवा येथील 38 वर्षीय  भिमसिंग गोरजी तडवी  हा युवक दि. 25 डिसेंबर रोजी मोलगी येथे बाजार तथा खाजगी कामानिमित्त गेला होता. त्याचा काही सामान खाजगी प्रवासी वाहनाने पाठवून तो त्याच्या दुचाकीने मोलगीहुन गावाकडे परतला होता. परंतु तो निंबीपाडा ता. अक्कलकुवा येथील पेट्रोल पंपजवळ मुख्य रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आला.
याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंदही पोलीसात करण्यात आली. या घटनेप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला. हा अपघात नसून घातपात असल्याचे म्हणत त्यांनी सखोल चौकशीची मागणी पोलीस अधिक्षकांकडे केली होती.परंतू चौकशी समाधानकारक होत नसल्याचा आरोप करत नातेवाईक येत्या 3 फेब्रुवारी पोलिस स्टेशन मोलगी येथे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याचे निवेदन आदिवासी विकास मंत्री,पोलीस अधिक्षक नंदुरबार,तहसीलदार अक्कलकुवा यांना देण्यात आले आहे.
         घटनास्थळावरील परिस्थितीनुसार भिमसिंग तडवीचा हा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. दुचाकीच्या नुकसानीच्या तुलनेत दुचाकी व मृतदेह रस्त्यापासून खूप लांब फेकले गेले असते परंतु दुचाकी व मृतदेह रस्त्यावरच पढून राहिल्याने आमच्या संशयात भर पडली होती, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर गोरजी ओल्या तडवी (मयताचे वडील), राजेंद्र गोरजी तडवी, (मयताचा भाऊ), कालुसिंग तडवी, भिका दामजा वसावे (मामा) व काकड्या जुन्या वसावे यांच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

जपानमधील वाकायामा राज्याबरोबरील सामंजस्य करारामुळे कुस्तीपटूंच्या तांत्रिक कौशल्यात भर – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

Next Post

चरणमाळ घाटात दोन वाहनांचा अपघात

Next Post
चरणमाळ घाटात दोन वाहनांचा अपघात

चरणमाळ घाटात दोन वाहनांचा अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add