Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांचे बँक खाते शून्य बॅलन्सवर उघडण्याचे आदेश द्यावे, हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Mahesh Patil by Mahesh Patil
June 28, 2021
in शैक्षणिक
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
शासनाच्या आदेशानुसार  कोविडमुळे शाळा बंद असल्या कारणाने शालेय पोषण आहार अंतर्गत देण्यात येणारे धान्य ऐवजी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून डायरेक्ट बेनिफिट ट्रांफरद्वारे विद्यार्थी यांचा बँक खात्यावर थेट रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि पालक यांचे संयुक्त बँक खाते उघडण्याचा आदेश शिक्षण विभागाकडून काढण्यात आला आहे.काही पालक बँकेत खाते उडण्यासाठी गेले असता काही राष्ट्रीयकृत बँका ५०० ते २००० रुपये खाते सुरू करण्यासाठी खात्यात जमा करण्यास सांगत आहेत तरी विद्यार्थ्यांचे पोषण आहार अंतर्गत बँक खाते शून्य बॅलन्सवर उघडण्याचे आदेश द्यावे अशी मागणी  हिंदु सेवा सहाय्य समितीतर्फे निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी  यांच्याकडे केली.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, गेल्या  मार्च २०२० पासून कोरोनाचा कारणाने अनेकांचे रोजगार बुडाले आहेत जेमतेम आता कुठे रोजगार सुरू होत आहेत, त्यातच पाल्याचा बँक खात्यासाठी एवढी रोख रक्कम गरिबांनी आणायची कुठून? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यातच  शासन- प्रशासन सामाजिक अंतर ठेवण्यासाठी सांगत असतांना विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यासाठी ३० जून पर्यंतची मुदत दिली असल्याने बँकेत पालक प्रचंड गर्दी करत आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेता आणि पालकांची आर्थिक परिस्थिती बघता आपण बँकांना विद्यार्थी यांचे बँक खाते शुन्य बॅलन्सवर सुरू करावे असा आदेशबँकांना द्यावा तसेच खाते उघडण्यासाठी समय मर्यादा १० जुलैपर्यंत शाळांना वाढवून द्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनवार हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, कपिल चौधरी, पंकज डाबी, जगदीश जगताप, नरेश जिनगर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील जुनी सिंधी कॉलनीतुन ३८ हजाराचा गुटखा जप्त

Next Post

पावसाळ्यानंतर कामाला प्रारंभ; ७ वर्षे काम रेंगाळने दुर्दैव- आ चंद्रकांत रघुवंशी*

Next Post
पावसाळ्यानंतर कामाला प्रारंभ; ७ वर्षे काम रेंगाळने दुर्दैव- आ चंद्रकांत रघुवंशी*

पावसाळ्यानंतर कामाला प्रारंभ; ७ वर्षे काम रेंगाळने दुर्दैव- आ चंद्रकांत रघुवंशी*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group