Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ येथील पर्यटनकांना तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधेसाठी अतिरिक्त निधी द्या : आ.आमश्या पाडवी 

team by team
February 2, 2023
in राजकीय
0
तोरणमाळ येथील पर्यटनकांना तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधेसाठी अतिरिक्त निधी द्या : आ.आमश्या पाडवी 
नंदूरबार l प्रतिनिधी
तोरणमाळ येथे येणाऱ्या पर्यटनकांना तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने  नियोजन समितीस अतिरिक्त स्वरूपात अधिकाधिक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आ. आमश्या पाडवी यांनी विभागीय नियोजन समिती च्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.
           जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा. डॉ.हिना गावित,आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते.यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले की,तोरणमाळ येथील निसर्गरम्य पर्यटनाचा विकास व्हावा तसेच अतिदुर्गम भागात रोजगार व उद्योगाची गंगा व्हावी या हेतूने २०२० साली शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी तोरणमाळचा विकासा साठी  प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
त्याअनुषंगाने प्रशासना कडुन सुमारे ५०० कोटींचा आराखडा शासनास सादर करण्यात आला. परंतु  सत्ताबदलानंतर आज अस्तित्वात असलेल्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येते आहे.अतिदुर्गम आदिवासी नंदुरबार जिल्ह्यात पर्यटन विकास होऊन रोजगार व उद्योग निर्मिती व्हावी या अनुषंगाने स्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या तोरणमाळ विकास प्राधिकरणास गती द्यावी तसेंच सद्य परिस्थितीत तोरणमाळ येथे येणाऱ्या पर्यटनकांच्या सोयी साठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे सांगत तोरणमाळच्या विकासा साठी जिल्हा नियोजन समितीस अतिरिक्त स्वरूपात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच धडगाव येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचा आराखडा मंजुर करुन निधी द्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

वाहतूकीस अडथळा ; दोघा वाहन चालकांविरोधात गुन्हा

Next Post

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खेळाडू घडविण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची मागणी करणार : जि. प.अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add