नंदुरबार l प्रतिनिधी
परमपूज्य रामदेव बाबा प्रणित पतंजली योग परिवारातर्फे आयोजित योग शिक्षक प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक शहर व तालुकाआणि ग्रामीण भागातील गावागावात योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प या प्रशिक्षण शिबिरातील महिला पुरुष योग साधकांनी केला आहे.
शहरातील गिरीविहार वाडी सभागृहात दि. 5 जानेवारीपासून सुरू झालेल्या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा काल समारोप झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा सरकारी वकील अड.निलेश देसाई,महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्षा अड.निता देसाई, उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते 25 सहभागी योग शिक्षक साधकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ प्रशिक्षक वसंत पाटील यांनी विविध योग मुद्रा आणि सूक्ष्म व्यायामाचे सादरीकरण केले.शहादा येथील कैलास भावसार यांनी योग शिक्षकाचीी भूमिका स्पष्ट केली.एन.डी. माळी यांनी सांगितले की, 25 प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून समाजात सर्वत्र योग चळवळ राबविण्यात येईल.अड.निलेश देसाई यांनी पतंजली योग समितीच्या कार्याचे कौतुक करून प्रत्येक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
योग शिक्षक प्रशिक्षण शिबिर यशस्वीतेसाठी पतंजलीचे जिल्हा प्रभारी एन. डी. माळी,भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी नवनीत शिंदे,जिल्हा संघटन प्रमुख वसंत पाटील,तालुका प्रभारी अजयसिंह गिरासे,विनोद सैंदाणे, प्रमोद मराठे,किशोर भावसार, भास्कर रामोळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महादू हिरणवाळे,महिला प्रतिनिधी किरण राजपूत, निकिता ठक्कर, वृषाली पाटील , मंगला गिरासे, आदिसह पतंजली योग समिती,भारत स्वाभिमान, ( न्यास) महिला पतंजली योग समिती,युवा भारत, किसान सेवा संघ नंदुरबार जिल्हा .साधकांनी परिश्रम घेतले.








