नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवण्यात येत असून या पंधरवड्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून सोमवारी कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त जिल्हा जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅलीचे उद्घाटन आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीस सकाळी ९.३० वाजता पोलिस मैदान, नेहरू चौक येथून सुरुवात झाली. रॅलीसाठी एकलव्य विद्यालय, डी.आर. माध्यमिक विद्यालय, एन्जल नर्सिंग कॉलेज व देव मोगरा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
यावेळी डॉ.अमित पाटील, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुलोचना बागुल, प्राचार्य डॉ.शिवाजी राठोड, डॉ.अभिजित गोल्हार, डॉ.प्रीती पटले, डॉ.जाफर तडवी, संगीता पाटील उपस्थित होते. या पंधरवड्यात शाळांमध्ये
प्रार्थनेनंतर कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञेचे वाचन करण्यात येणार आहे. शाळा सूचना फलकांवर कुष्ठरोगाबाबत संदेश लिहिला जाईल. शाळांमध्ये नुक्कड़ नाटक, प्रश्न मंजुषा निवय स्पर्धा, कष्ठरोगावरील गाणी, कवितावाचन, रांगोळी स्पर्धा, कठपुतली, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे.