नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील नगर पालिका परिसरात दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने सुमारे दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील माळीवाडा येथील गणेश अशोक पाटील हे नगर पालिका परिसरात असतांना त्यांच्या दुचाकीच्या (क्र.एम.एच.३९ एस ८१८६) डिक्कीत असलेली १ लाख ८९ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्याने चोरुन नेली. याबाबत गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.बी.मोहिते करीत आहेत.








