नवापूर | प्रतिनिधी
नवापूर येथे ५ फेब्रुवारी रोजी हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष कमलेश पाटील यांनी दिली.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल नवापूर प्रखंड व हिंदू मेळावा आयोजन समितीच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू मेळावा बाबत आज श्री.दत्त मंदिर हॉल नवापूर येथे पत्रकार परीषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषद जिल्हा नंदुरबार चे प्रचार प्रमुख किरण टिभे यांनी भव्य हिंदू मिळावा आयोजित करण्यासंबंधीची प्रस्तावना मांडली व हिंदू मेळावा आयोजन समिती च्या सदस्यांच्या परिचय करून दिला, त्यात हिंदू मेळावा आयोजन समिती प्रमुख पदी कमलेश पाटील, कार्यकार्यकारी अध्यक्षपदी दर्शन दीपक पाटील व उपाध्यक्ष पदी अजय परदेशी व शामूभाई गावित यांची निवड सर्वानुमते झाली.
त्यानंतर समितीचे अध्यक्ष कमलेश पाटील यांनी माहिती दिली की, नवापूर शहरात युवा युवक युवती ,पालक व वयोवृद्ध नागरिक यांना शिक्षण सोबत धार्मिक ज्ञान व संस्कार मिळावे म्हणून हिंदू मेळाव्याचे आयोजन ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत नवापूर शहरात श्री.शिवाजी हायस्कूल या मैदानावर करण्यात आलेले आहे, मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय संत कालीचरण महाराज पुणे हे आशीर्वचन करणार आहेत. कार्यक्रमानंतर जाहीर भंडार्याचे आयोजन केलेले आहे.
सांगीतले. कार्यकारी अध्यक्ष दर्शन पाटील यांनी नवापूर शहर व तालुक्यात गावोगावी कसे प्रचार व प्रसार कार्य सुरू आहे याची माहिती दिली. त्यानंतर समितीचे सर्व सदस्य व ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश पाटील अजयभाई अग्रवाल व युवा कार्यकर्ते जितेंद्र दुसाने यांनी नवापूर शहरातील सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त संख्येत या मेळाव्यात उपस्थित राहून प्रमुख वक्ते यांच्या आशीर्वाचनच्या लाभ घ्यावा आवाहन केले.यावेळी विश्व हिंदू परिषद नंदुरबारचे सहमंत्री शामराव गावित यांनी आभार प्रदर्शन केले








