नंदुरबार l प्रतिनिधी
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणूकीसाठी सोमवार ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दु. ४ या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूकीत मतदारांना मतदार यादीत नाव शोधण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांच्या बाहेर मतदार सहायता कक्ष तसेच जिल्हास्तरावर एक मतदार सहायता कक्ष उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हास्तरावर मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडलेले आहे, याबाबत शोध घेणे सुलभ होण्यासाठी जिल्हास्तरावर 02564-210008 हा मतदारांना सहायता कक्षाचा क्रमांक उपलब्ध आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या संकेतस्थळावर https://nandurbar.gov.in तसेच https://ceoelection. maharashtra.gov.in/gtsearch/ ही लिंक उपलब्ध करुन दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी व मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध होण्यासाठी मतदार सहायता कक्षाची मदत घ्यावी असे आवाहन श्रीमती खत्री यांनी केले आहे.








