खेतिया | वार्ताहर –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजस्थान राज्यातील भीलवाडा मालसेरी येथे गुजर समाजाचे आराध्य देवता श्री भगवान देवनारायणजी यांचा ११११ वा अवतरण महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शहादा येथील रहिवासी तथा अखिल भारतीय गुर्जर महासभेचेे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील हे व्यासपिठावर उपस्थित होते.
भीलवाडा मालसेरी येथे गुजर समाजाचे आराध्य देवता श्री भगवान देवनारायणजी यांचा ११११ वा अवतरण महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून गुजर समाजाचे आराध्य देवता श्री भगवान देवनारायण यांची पूजा अर्चना करुन देशभरातील गुर्जर समाजातील बंधू-भगिनींना संबोधीत केले. ना.मोदी म्हणाले, गुर्जर समाजाचे शौर्य, पराक्रम, देशभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्ररक्षा, संस्कृतीची रक्षा केली आहे. गुर्जर समाजाने प्रत्येक कालखंडामध्ये प्रहरीची मुख्य भूमिका निभावली आहे. गुर्जर समाजाच्या माता भगिनींनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे.
संस्कृतीसाठी ही परंपरा निरंतर सुरू आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी देशभरातील गुर्जर समाजातील बंधू-भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील, केंद्रीय मंत्री मेघवाल, हेमराज गुर्जर, रामप्रसाद सुरेशदास, सुभाष बेहड्यानी, बच्चूसिंह बेसला आदी मान्यवर पंतप्रधानांसोबत व्यासपिठावर उपस्थित होते.