नंदुरबार| प्रतिनिधी
संसदीय विकास परियोजनेअंतर्गत राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातील ४ खासदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला. संसदीय संकुल विकास परियोजने अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी संसदीय संकुल विकासाचे प्रयोग राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
संसदीय संकुल विकास परियोजने अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी संसदीय संकुल विकासाचे प्रयोग राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ४ खासदारांची समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे. यात समितीने नवापूर तालुक्यातील खांडबारा व नंदुरबार तालुक्यातील डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या कृषी विज्ञान केंद्र येथे ग्राम विकासातील प्रयोगाची पाहणी शेतकरी संवाद यात्रा पार पडली.
याप्रसंगी भाजपाचे राष्ट्रीय संगठक व्ही.सतीश, आदिवासी विकासमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित,जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, प्रभू वसावा, रामसिंग राठवा, खा.डॉ.हिना गावीत, मध्यप्रदेशचे डॉ.सुमेरसिंग सोलंकी, गजेंद्रसिंग पटेल, दुर्गादास उईके, राजस्थानचे जसकौर मीणा आणि गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आदी उपस्थित होते.जिल्ह्यात स्थलांतरण थांबवणे, उपलब्ध संसाधन आधारीत उपजीविकेच्या संधी निर्माण करून आत्मनिभैर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
खांडबारा व वडसत्रा येथे जैविक उत्पादन, विहीर खोलीकरण, एकात्मिक शेती तसेच शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत राईस मिल, पशुखाद्य निर्मिती यांना भेटी देण्यात आल्या. नवापूर तालुक्यातील खांडबारा व तलावीपाडा परिसरातील सेवा समितीच्या सदस्यांशी खासदारांनी संवाद साधला. कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक सहयोगाने परिसरातील संकुल विकास प्रयोग प्रत्यक्ष पाहणी केली. अभ्यास तसेच कृषी विज्ञान केंद्राद्वारे नंदुरबार परिसर विकासासाठी स्थानिक गरजेवर आधारीत तंत्रज्ञान वापराचे प्रयोग,
उपलब्ध संसाधन आधारीत गावस्तरीय कृषी, वन पशुधन प्रक्रिया, कृषी पुरक उद्योग याविषयी सादरीकरण करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय पोषक तृणधान्य या पार्श्वभुमीवर जैवविविधता, प्रक्रियायुवक पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यात सातपुडयातील मेराली जैव विविधता संकलन संवर्धन व प्रशिक्षण केंद्र कंजाला, मोलगी परिसर सेवा समिती, माविम अंतर्गत लोक संचलित साधन केंद्र सहयोगिनी, स्वयंसेवी संस्था, शेतकरी उत्पादकांनी सहभाग घेतला.