नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून वातावरणात मोठे बदल दिसून येत असून. थंडी कमी झाल्यानंतर आणखी वातावरणात ऊन सावलीचा खेळ सुरू असतानाच. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर नवापूर तालुक्यासह नंदुरबार तालुक्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
आज दुपारी अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. रब्बी हंगामातील पिके तसेच उघड्यावर असलेला शेतीमाल, गुरांचा चारा याची नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
एकूणच नवापूर तालुक्यातील विसरवाडी व नंदुरबार तालुक्यातील वेळावद, धानोरा आदी गावांमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. दुपारी नवापूर तालुक्यात या पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात या पावसाची रिमझिम सुरू होती.