नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुका विधायक समिती संचलीत माध्यमिक विद्यालय शेजवा पो पिंपळोद ता जि नंदूरबार शाळेत “राष्ट्रीय मतदार दिन विविध स्पर्धांसह पथनाट्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम शालेय स्पर्धेंच्या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक दत्तु पाटील यांनी केले यात चित्रकला पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा घोषवाक्य, गाणे,काव्य इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे परीक्षण शाळेचे मुख्याध्यापक दत्तु पाटील व श्रीमती नेहा शर्मा यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे जेष्ठ शिक्षक विजय पवार रचित “मतदानचा हक्क मतदारालाच फक्त” पथनाट्य सादर करण्यात आले यात मतदाराचे वय किती असते? मतदार मतदानाला जाताना काय सोबत घेऊन जाणे? मतदार यादीत नाव कधी नोंदवावे? मतदाराचे मत किती अमुल्य आहे ? मतदाराचे मतदान झाले हे कसं कळतं? मतदान केंद्रावर मतदान कसं होतं? ह्या विषयावर विद्यार्थ्यांसमोर हास्य स्वरुपात सादर करण्यात आले यात शाळेचे उपशिक्षक विजय पवार, दिपक वळवी, आनंदराव पवार, रामानंद बागले, संजय बोरसे हरूनखाॅ शिकलीकर यादी नी भाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी मतदार दिनाची प्रतिज्ञा सामुहिक पध्दतीने घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपक वळवी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या कनिष्ठ लिपिक श्रीमती.नेहा शर्मा शाळेचे. शिपाई संजय वसावे, दिनेश पवार आदींनी परीश्रम घेतले. सदरील कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली.