म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पाडळदा येथील वल्लभ विद्यामंदिर शाळेत प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण व माझी शाळा फोटोफ्रेमचे आनावरण व लोकार्पण करण्यात आले.
येथे विविध संस्थांमध्ये 74 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. विविध कार्यकारी सोसायटी पाडळदे येथे चेअरमन योगेश मोहन पाटील यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत पाडळदे बुद्रुक येथे उपसरपंच रवींद्र पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुलांची शाळा व कन्या शाळा येथे जी .प .चे माजी सदस्य सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार ईश्वर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तर वल्लभ विद्यामंदिर पाडळदे येथे चेअरमन दत्तात्रय सोमजी पाटील यांनी ध्वजारोहण केले तसेच स्काऊट झेंड्याचे ध्वजारोहण मुख्याध्यापक विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच कृष्ठरोग निर्मूलनाची शपथ चतुर पाटील यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्याकडून म्हणून घेतली .तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत सामुद्रे यांनी कृष्ट रोग विषयीची माहिती उपस्थितांना दिली.
तसेच वल्लभ विद्यामंदिर पाडळदे येथील उपशिक्षक गणेश पाटील यांनी दीपोत्सव दिवाळी विशेष अंक तसेच लेख आमची शाळा आमचे उपक्रम, गुढी उभारू भाषेची हा अंक चेअरमन दत्तात्रय पाटील, व्हॉइस चेअरमन विजय पाटील, ज्येष्ठ संचालक रमेश चौधरी शाळेचे सचिव डॉक्टर विलास पटेल यांना मुख्याध्यापक विजय पाटील, पर्यवेक्षक आंबालाल चौधरी व गणेश पाटील यांनी भेट दिला.व माझी शाळा कविता फोटो फ्रेम याचे लोकार्पण फित कापून वल्लभ विद्या मंदिर शाळेचे चेअरमन सचिव व जेष्ठ संचालक यांच्या हस्ते करण्यात आले.सुत्रसंचालन चतुर पाटील यांनी केले. कार्यक्रमाला गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी संचालक मंडळ ग्रामसेवक ,तलाठी , वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सर्व कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.