Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुदतीत घरकुले पूर्ण न केल्यास निधी परत जाण्याची टांगती तलवार

team by team
January 29, 2023
in राज्य
0
मुदतीत घरकुले पूर्ण न केल्यास निधी परत जाण्याची टांगती तलवार
नंदूरबार l प्रतिनिधी
                 गोरगरिबांना स्वप्नातील हक्काचे घर मिळण्यासाठी असणाऱ्या घरकूल योजनांमधील तब्बल ३१६९  घरकुले तळोदा तालुक्यात अद्यापही अपूर्ण आहेत. त्यात ९७८ घरकुलांचे काम सुरूच झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घरकुले पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर जनजागृती सह गावोगावी भेट दिली जात आहे. दुसरीकडे अपूर्ण राहिलेली घरकुले मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून यंत्रणेला मिळाल्या आहेत. दिलेल्या मुदतीत घरकुले पूर्ण न केल्यास निधी परत जाण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे अपूर्ण राहिलेली घरकुले पूर्ण करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
              तळोदा तालुक्यात सन २०१६-१७  ते २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेत १० हजार ६२१ घरकुले मंजूर होती. त्यापैकी ९ हजार ४२९ घरकुले पूर्ण झाली असून ११७५ घरकुले मात्र अपूर्ण आहेत. तर २६६ घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत. तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात २०१३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती त्यापैकी ४७१ घरकुले पूर्ण झाले असून १६२२ घरकुले अपूर्ण आहेत. त्यातील ६०७ घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत.
           शबरी आवास योजनेत सन २०१६-१७ ते २०२१-२२ या आर्थिक वर्षात १४६१ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी ११०५ घरकुले पूर्ण असून ३३९ घरकुले अपूर्ण आहेत. ९९ घरकुलांचे बांधकाम अद्यापही सुरू झालेले नाही. तर रमाई आवास योजनेत २४६ घरकुले मंजूर असून २०६ घरकुले पूर्ण झाले आहेत तर ३३ घरकुले अपूर्ण आहेत व ६ घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत.
             घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत घरकुल पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. तरीही बांधकाम सुरू न झाल्यास फेब्रुवारी अखेर अशी घरकुले रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे त्यानंतर शासनाकडून कुठलाही निधी दिला जाणार नसल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे घरकुले पूर्ण करून घेण्याचे यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. याकरिता अमृत महा आवास अभियानांतर्गत जलद गतीने घरकुलांचे कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
             जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली अमृत महा आवास अभियानांतर्गत घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परशुराम कोकणी ,सहाय्यक गट विकास अधिकारी के एम पवार ,विस्तार अधिकारी बी के पाटील यांनी प्रतापपूर येथे भेट देऊन लाभार्थ्यांना घरकुले पूर्ण करण्याचा सूचना दिल्या. तशी मोहीम तालुक्यातील सर्व गावात राबवली जाणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

श्रॉफ हायस्कूलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा 

Next Post

ऊसतोड मजुरांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर 

Next Post
ऊसतोड मजुरांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर 

ऊसतोड मजुरांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add