नंदुरबार | प्रतिनिधी
मनरेगा मस्टरवरील ग्रामसेवकांची स्वाक्षरी बंद करण्याचा शासन निर्णय पारीत करण्यात आला असुन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या मागणीला यश आले आहे.यापुढे हजेरीपटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवक नोंदवू शकेल व याबाबत पडताळणी करून हजेरी पटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवकांना अधिकार देण्यात आले असल्याचा आदेश पारीत करण्यात आला असुन यावर अपर मुख्य सचिव (रोहयो) नंद कुमार यांची स्वाक्षरी आहे.
या आदेशात म्हटले आहे की,शासन निर्णय दि. २७ मे, २०११ नुसार मनरेगाची विविध कामे करण्यासंदर्भात इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक ९ व १० नुसार कामाच्या ठिकाणी मजुरांना सोयी सुविधा पुरविणे व मजुरांची दैनंदिन हजेरी घेणे व इतर नोंदी घेणे इत्यादी कामे करण्यासंदर्भात जबाबदारी संबंधित यंत्रणातील क्षेत्रिय तांत्रिक संवर्ग व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर असुन या कामात संबंधित ग्रामसेवक यांनी मदत करणे व मजुरांची उपस्थिती ग्राम रोजगार सेवक यांनी नोंदविल्यावर त्याची खात्री,पडताळणी संबंधित यंत्रणेचे तांत्रिक संवर्ग, ग्रामसेवक करतील अशी तरतुद होती.
दरम्यान ग्रामसेवक संघटनेने त्यांच्या निवेदनाद्वारे ग्रामसेवकांना विविध कामे करावी लागतात. त्यात निवडणुक आयोगाची कामे, कृषि विभागाची कामे, सामाजिक न्याय विभागाची कामे या सर्व कामांमुळे ग्रामसेवकावर अतिरिक्त ताण व मानसिक तणावामुळे मनरेगा सारख्या अत्यंत व्यापक योजनेस ग्रामसेवक न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून वेळोवेळी शासनास येत होती. दि.३० नोव्हेबर २०२२ रोजी याबाबतमंत्री (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ग्रामसेवक संघटनेची मागणी विचारात घेवून यात बदल करण्यात आला असुन शासनाने शासन निर्णय २७ मे, २०११ मध्ये सुधारणा करुन सदर शासन निर्णयात बदल केला असुन यापुढे हजेरीपटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवक नोंदवू शकेल व याबाबत पडताळणी करून हजेरी पटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवकांना अधिकार देण्यात आले असल्याचा आदेश पारीत करण्यात आला असुन यावर अपर मुख्य सचिव (रोहयो) नंद कुमार यांची स्वाक्षरी आहे.यामुळे आता स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित झाली असुन ग्रामरोजगार सेवकांना अधिकार देण्यात आले आहेत.
नरेगा यंत्रणा स्वतंत्र करणे साठी बर्याच दिवसापासून मागणी लावून धरलेल्या संघटनेचे मागणीला पहिले पाउल टाकत नरेगा मस्टरवरील स्वाक्षरी बंद करत यश संपादन केले आहे.त्यामुळे ग्रामसेवकांवरीत कामाचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.-
संजीव निकम
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना,राज्याध्यक्ष