Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाघाळे येथे आदिवासी कला व क्रीडा महोत्सवाचा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते शुभारंभ

team by team
January 28, 2023
in राजकीय
0
वाघाळे येथे आदिवासी कला व क्रीडा महोत्सवाचा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते शुभारंभ

नंदूरबार l प्रतिनिधी

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास व्हावा, त्यांना दिशा मिळावी या उदात्त हेतूने आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत वाघाळे यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित तीन दिवसीय आदिवासी कला व क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आदिवासी विकास
मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार बापू चौरे होते.

कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ.विजयकुमार गावित यांनी वाघाळे गावाने आणि प्रतिष्ठानने सुंदर कार्यक्रम आयोजित केला असून महोत्सवाच्या सहभागी विद्यार्थी, खेळाडू आणि कलावंत यांचे कौतुक करत महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास होणार असल्याचे सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हावे. फोटोग्राफी, चित्रकला, निबंधलेखन, वक्तृत्व,
व्हॉलिबॉल या सारख्या कला व क्रीडा स्पर्धांमध्ये युवकांनी सहभागी होऊन, राज्य, राष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध करावे, अशा प्रकारचे आवाहन केले.

 

कार्यक्रम अध्यक्षस्थानी बापू चौरे यांनी प्रतिष्ठान राबवित असलेले उपक्रम हे समाजाच्या विकासासाठी आणि युवापिढीस दिशा देणारे आहेत. भविष्यात प्रतिष्ठानमुळे एक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळ निर्माण
होईल, त्यासाठी आदिवासी समाज बांधवांनी प्रतिष्ठानच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले आहे. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी आपल्या मनोगतात वाघाळेकर बांधव आणि प्रतिष्ठान यांनी महोत्सव आयोजित केले, यातून आदिवासी संस्कृतीचे संवर्धन होईल. यातून आदिवासी मुलांच्या कला-कौशल्याचा विकास होईल, असे प्रतिपादन केले.

 

नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष नाईक यांनी महोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी विद्यार्थी व समाज एकवटला असल्याचे सांगत, यातून आदिवासी मुलांना एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन केले आहे.

 

याप्रसंगी मान्यवरांच्या राष्ट्रीय स्तरावर रोलबॉल – स्केटींग खेळाडू ओम संतोष चौरे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी नंदुरबार पंचायत समिती सभापती माया मालचे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार, सरपंच सुषमा पवार, से.नि.कार्यकारी अभियंता के.टी.सूर्यवंशी, से. नि.कार्यकारी अभियंता मोहराव सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते ताराचंद मालचे, से.नि.पोलीस पाटील छोटू पवार, जि.प.सदस्य विश्वास बागुल, जि.प.सदस्य देवमन पवार, धिरज अहिरे, प.स.सदस्य संतोष साबळे, प्रतिष्ठान उपाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, समन्वयक प्रा.मंगलदास अहिरे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी वसंत चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, विकास अधिकारी राजू गायकवाड, उपसरपंच गणेश चौरे, प.स.समिती माजी सदस्य देवमन चौरे, डोंगऱ्यादेव माऊली संघर्ष समितीचे अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे, माळमाथाचे राजेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते रुस्तम चौरे, वाघाळे परिसरातील लोकनियुक्त सरपंच, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

महोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुलतान पवार यांनी केले. सूत्रसंचालन वंदना कोकणी व हसमुख चौरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन ग्रामविकास अधिकारी संतोष चौरे, ग्रामसेवक प्रवीण पवार, रमेश बागुल, विक्रम महाले, कैलाश पवार, एकनाथ सूर्यवंशी, मधुकर महाले, मगन पवार, ग्रा. प. सदस्य धनाजी गायकवाड, गिरीश गावित, अलका पवार, भाग्यश्री गायकवाड, लक्ष्मण चौरे, कैकयी पवार, सुरेखा गायकवाड, कल्पना गांगुर्डे, सखुबाई गायकवाड, हिरालाल पवार, शशिकांत भुसावरे, वसंत भोये, शामराव पवार,
डॉ.प्रतिभा चौरे, लता गांगुर्डे, हर्षाली गायकवाड, निलेश गावीत, कालू ठाकरे, हिरू वळवी, जीवन कोकणी, रुपसिंग कोकणी, अविनाश कोकणी, शांताराम गावित, शामराव गायकवाड, संतोष पाडवी, संतोष पवार, चंद्रसिंग बागुल,
डॉ.हिमानी गायकवाड, काळू भोये, सचिन पवार, भावराव कोकणी, सुनील गांगुर्डे, छोटू चौरे, दासू गावीत, लोटन गावीत, हिरूपन कोकणी, दिनेश अहिरे, कैलाश ठाकरे, रमेश कोकणी, सुनील गवळी, दिलवर गांगुर्डे, छोटीराम गावीत, योगेश गावीत, डी के सागाळी, विनोद गायकवाड, प्रकाश अहिरे, रमण कोकणी, विकी राऊत, निलेश साबळे, यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले निदर्शने

Next Post

मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

Next Post
मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add