नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विरोधात निदर्शने करीत भाजपच्या वरिष्ठांनी पाठिंबा देण्याचा आदेश दिला तरी त्या आदेशाचे पालन करणार नसल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांचे स्पष्ट केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला महागाई विरोधाच्या आंदोलनात काळे फसले होते ज्या उमेदवाराला देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या नागरिकाचा सन्मान करता येत नाही. त्याला भाजपाने पाठिंबा देऊ नये आणि पक्षाने पाठिंबा दिला तरी सुज्ञ नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते अशा उमेदवाराला मतदान करणार नाहीत असा इशारा नंदुरबार मधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरसेविका पुत्र लक्ष्मण माळी यांनी दिला आहे.
लक्ष्मण माळी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुण मतदारांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विरोधात निदर्शने केले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांच्या हातात सत्यजित तांबे पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासत असलेले बॅनर होते.एकूणच पदवीधर मतदारसंघाच्या प्रचार संपायला आता दोन दिवसाचा अवधी उरला असला तरी भाजप आतून सत्यजित तांब्यांना होणारा विरोध तीव्र झाला असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात पाण्यास मिळत आहे भाजपा कार्यकर्ते पक्षाने आदेश दिला तरी त्यांच्या पाठीशी राहणार नाहीत असा संदेश या आंदोलनातून भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे.