Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम

team by team
January 27, 2023
in राज्य
0
नंदूरबार येथील हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम

नंदूरबार l प्रतिनिधी

येथील हिरा प्रतिष्ठान संचलित सहकारमहर्षी श्री.अण्णासाहेब पि.के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री.काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्री.काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, सौ. ताईसाहेब इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर,संस्कृती शिशु विहार व नुतन बालमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष तसेच काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी यांच्या शुभहस्ते शालेय प्रांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न करण्यात आले.

 

 

यासमारंभ प्रसंगी संस्थेचे संचालक बळवंत जाधव, डॉ.सुधीर भोलाणे, महेंद्र किसन चौधरी,संस्थेच्या संचालिका अनिता चौधरी,हिरा फाउंडेशनच्या संचालिका प्रणिता चौधरी,सचिव रुपेश चौधरी,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्र पाटील, किरण त्रिवेदी तसेच सर्व विभागाचे प्राध्यापक-शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त हिरा प्रतिष्ठान अधिनिस्त सर्व विद्यालयांच्या वतीने देशभक्तीपर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात थोर महापुरुषांची वेशभूषा, वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य अशा विविध कलागुणांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी देशप्रेमाचा व एकतेचा संदेश देत प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा केला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय इनस्पायर्ड अवॉर्ड मानक योजना अनुदान प्राप्त माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी कु.अक्षदा अजित गावित,कु.किमया मुकुंद चौधरी, कु.चंचल अभय सोनार, कु.पूर्वा मनोज जाधव या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला तसेच नाशिक विभागीय स्तरावर विविध खेळ प्रकारात निवड झालेले

 

 

माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी विलास धरमदास जाधव,योगेश संतोष बंजारा,निलेश संतोष बंजारा,दिव्या उदय चव्हाण,अभय भरत पेंढारकर,खुशी प्रफुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता 8 वी एनएमएमएस परीक्षेत 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

 

 

त्यानंतर शोधनिबंध 30 वे बाल विज्ञान परिषद विज्ञान प्रदर्शन जिल्हास्तरावर निवड झालेले इयत्ता 12 वी चे विद्यार्थी कु.वैष्णवी अभय सोनार, कु.प्रीती नीलकंठ शिरसाठ या विद्यार्थिनींचा व तालुका विज्ञान प्रदर्शन द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी कु.भूमिका कैलास पानपाटील, कु.निधी प्रशांत दामोधर तसेच मतदार दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत इयत्ता 12 वी चे यशस्वी विद्यार्थी कु.प्रीती नीलकंठ शिरसाठ, कु.भाग्यश्री पोपट चव्हाण या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार,ध्वजारोहणाचे सुत्रसंचालन महेंद्र फटकाळ,सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्रीमती.नैना सोनवणे व आभार प्रदर्शन श्रीमती.सोनल मोरे यांनी केले तर समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागाचे प्राध्यापक – प्राध्यापिका, शिक्षक – शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा पोलीस दलातील 5 अमंलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षकांनी दिली पदोन्नतीची भेट

Next Post

तळोदा येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सहाशे आभा कार्ड वाटप

Next Post
तळोदा येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सहाशे आभा कार्ड वाटप

तळोदा येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सहाशे आभा कार्ड वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add