Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दवाखान्याने किनारा गाठल्याने मोठा अनर्थ टळला

team by team
January 26, 2023
in राज्य
0
दवाखान्याने किनारा गाठल्याने मोठा अनर्थ टळला
नंदुरबार  l  प्रतिनिधी
अतिदुर्गम भागातील नर्मदा काठावरील रहिवाशांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी युरोपियन कमिशनने भेट दिलेल्या तरंगता दवाखानाचा मोठा घसारा  झाल्याने गेल्या आठवड्यात त्याच्या तळाला छिद्र पडल्याने गळती लागून दवाखान्यात पाणी शिरले होते. आंबाईपाडा येथे सेवा देण्यासाठी चार जणांच्या पथकासह सदर दवाखाना सदरची घटना घडली. मात्र, हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने दवाखान्याने किनारा गाठल्याने अनर्थ टळला. यामुळे सन २०१५ मध्ये मनिबेलीच्या एका पाड्यावर थांबलेल्या पहिल्या तरंगत्या दवाखान्यानंतर दुसरा तरंगता दवाखानाही आता थांबला आहे.याबाबत आरोग्य विभागाने मोठी गुप्तता पाळली होती मात्र स्थानिक नागरिकांमध्ये ही घटना उघडकीस आली.
नर्मदा काठावरील रहिवाशांना आरोग्यासुविधा पुरविण्यासाठी युरोपियन कमिशनने सन २००५ मध्ये दोन तरंगते दवाखाने नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सुपुर्द केले होते. यामुळे जवळपास ८ ते १० गावे व २५ ते ३० पाड्यांना याच दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा दिली जात होती. मात्र सन २०१५ मध्ये एक तरंगता दवाखाना मनिबेलीच्या एका पाड्यावर नादुरुस्त झाला होता. त्यानंतर तो तसाच राहिला. मात्र त्यानंतर नर्मदा काठावरील रहिवाशांना एक तरंगता दवाखाना व तीन बोटींच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविली जात होती. त्यातच दुसरा तरंगत्या दवाखानाचा देखील मोठा घसारा न झाल्याने तो धोकादायकच बनला होता.
तरंगता दवाखान्यावर कार्यरत पथकातील कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून सेवा द्यावी लागत होती. त्यातच गेल्या आठवड्यात चार जणांच्या पथकासह सदर दवाखाना आंबाईपाडा येथे सेवा देण्यासाठी गेला असता तळाला पडलेल्या छिद्रामुळे दवाखान्याच्या आत पाणी शिरले. जवळपास गुडघाभर पाणी आत शिरले होते. यामुळे सदर प्रकार कर्मचाऱ्यांच्या तात्काळ लक्षात आल्याने त्यांनी धोकादायक प्रवास करुन तात्काळ किनारा गाठल्याने अनर्थ टळला अन् दुसऱ्या तरंगत्या दवाखान्याचाही अंतिम प्रवास संपला. खरे तर सन २००५ ते सन २०२३ अशा १८ वर्षांच्या कालावधीत याची देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र ते होवू शकले नाही. यामुळे दुसरा तरंगता दवाखानाही थांबला आहे.याबाबत आरोग्य विभागाने मोठी गुप्तता पाळली होती मात्र स्थानिक नागरिकांमध्ये ही घटना उघडकीस आली.
बातमी शेअर करा
Previous Post

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत

Next Post
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add