Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बजाओ: ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी वर्षातून १५ दिवस असेल सुट

team by team
January 24, 2023
in राज्य
0
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी

 

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण ) नियम 2000 नुसार श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यासाठी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षांमध्ये 15 दिवस सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्याबाबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आदेशित केल्याचे एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

नंदुरबार जिल्ह्यात 2023 यावर्षात 10 मार्च शिवजयंती (तिथीनुसार), 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, 29 जुलै मोहरम (ताजिया), 23 सप्टेंबर (गौरी विसर्जन) पाचवा दिवस, 25 सप्टेंबर (सातवा दिवस), 27 सप्टेंबर, (नववा दिवस ), 28 सप्टेंबर (अनंत चर्तुदशी) असे गणेशोत्सावाचे चार दिवस, 22 व 23 ऑक्टोबर नवरात्र उत्सव, 12 नोव्हेंबर (लक्ष्मीपूजन) , 25 डिसेंबर ख्रिसमस, 31 डिसेंबर आणि उर्वरीत 3 दिवस शासनाच्या महत्वाच्या सण, उत्सव व कार्यक्रमासाठी राखीव असतील.

 

 

सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार ध्वनिक्षेपकाचा आवाज ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण ) नियम 2000 मधील विहित मर्यादेच्या आत ठेवावा. ध्वनीक्षेपण रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत करता येईल. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. ध्वनीक्षेपकाचा वापर करताना आक्षेपार्ह ध्वनीक्षेपण करु नये, तसेच कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ध्वनीक्षेपकाची ध्वनीमर्यादा ही 45 डेसीबल पेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) मधील तरतुदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

 

ध्वनीक्षेपनाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास ध्वनीक्षेपण परवानगी कोणतीही पुर्वसूचना न देता रद्द करणेत येईल. ध्वनीक्षेपण परवानगीत बदल करण्याचा अगर परवानगीत रद्द करण्याचा अधिकार जिल्हादंडाधिकारी नंदुरबार यांनी राखून ठेवले आहे. तसेच कोविड-19 विषाणुंचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ नये याकरिता जिल्हा प्राधिकरणाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून पारीत केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कुढावद गावाजवळ ट्रकच्या चाकाखाली आल्याने एक ठार

Next Post

मोठ्ठी बातमी :विहीरीत सुरुंगचा स्फोट, दगड लागून ऊसतोड मजूर ठार

Next Post
मोठ्ठी बातमी :विहीरीत सुरुंगचा स्फोट, दगड लागून ऊसतोड मजूर ठार

मोठ्ठी बातमी :विहीरीत सुरुंगचा स्फोट, दगड लागून ऊसतोड मजूर ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add