Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतीय जनता पक्ष संघटन वाढीसाठी सरल ॲपबाबत कार्यशाळा 

team by team
January 24, 2023
in राजकीय
0
भारतीय जनता पक्ष संघटन वाढीसाठी सरल ॲपबाबत कार्यशाळा 
शहादा l प्रतिनिधी
 संघटन मजबुत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते मजबुतीने उभे राहिले पाहिजे. येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था,नगरपालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात ठेवत आपल्याला पक्ष कार्य मजबुत करायचे आहे,असे आवाहन जिल्हा सरचिटणीस निलेश माळी यांनी केले.
     भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढीसाठीच्या सरल ॲपबाबत माहिती देण्यासाठी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.शहादा येथील कृषी भवन येथे सोमवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील होते.यावेळी प्रदेश सदस्य डॉ . राजेंद्रकुमार गावीत, तालुका  कार्याध्यक्ष डॉ.किशोर पाटील, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, पंचायत समिती सदस्य विरसिंग ठाकरे, श्रीराम पाटील तिखोरा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर मोरे, मंदाण्याचे माजी उपसरपंच अनिल भामरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
   यावेळी मनोगत व्यक्त करतांना  तालुका कार्याध्यक्ष डॉ. किशोर पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा पक्ष नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सत्ता असलेला पक्ष आहे .पक्षाचे कार्य अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवसातून किमान अर्धा ते पाऊण तास पक्षासाठी काम करावे. पक्ष मजबूत होईल यासाठी केंद्र शासनाच्या,मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या यांच्या जनतेसाठी महत्त्वकांक्षी असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे.
जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील म्हणाले की, सरल ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी व बुथप्रमुख, कार्यकर्त्यानी जनतेपावेतो पोहोचून प्रत्येक कार्यकर्ता ऑनलाइन भारतीय जनता पक्षाची जोडले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी मिळून कार्य केले पाहिजे.पक्ष संघटन मजबूत होईल यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने परिश्रम घेतले पाहिजेत.याप्रसंगी तालुका सरचिटणीस हिम्मतसिग गिरासे,डॉ.विजय चौधरी,जे. पी.आप्पा पाटील,सरपंच परीषद अध्यक्ष विठ्ठल ठाकरे,प्रा .डी.सी.पाटील,प्रा.ज्ञानी कुलकर्णी, कार्तिक नाईक,हेमराज पवार, निलेश पाटील,माधव पाटील, संजय पाटील,सुरेश पाटील, सुभाष वाघ यांच्यासह ग्रामीण भागातील सरपंच,उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त युवासेनेतर्फे विविध कार्यक्रम

Next Post

नंदुरबार शहरातील वृंदावन कॉलनीत घरफोडी, अडीच लाखाचा ऐवज लंपास

Next Post
आमलाण येथे दोघांना मारहाण,  परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरोधात गुन्हा

नंदुरबार शहरातील वृंदावन कॉलनीत घरफोडी, अडीच लाखाचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026
रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

March 27, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add