Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रॉफ हायस्कूलचा सायबर स्मार्ट स्कूल म्हणून गौरव

team by team
September 12, 2021
in शैक्षणिक
0
श्रॉफ हायस्कूलचा सायबर स्मार्ट स्कूल म्हणून गौरव

नंदुरबार | प्रतिनिधी
नीति आयोगाच्या अटल इनोवेशन मिशन  व डब्ल्यू. एन. एस. केअर्स फाउंडेशनचा  सायबर स्मार्ट स्कूल मउपक्रम नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये संपन्न झाला. यात सुमारे अठराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ऑनलाइन सायबर क्राईम व फसवणुकी बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडविण्यात आली.या उपक्रमांतर्गत शाळेला  सायबर स्मार्ट स्कूल प्रमाणपत्र देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजन शाळेतील अटल टिंकरिंग लॅब प्रमुख राजेंद्र मराठे यांनी केले
कोविड काळात ऑनलाईन शिक्षण घेत असताना अनेक गैरप्रकार वाढत आहेत.योग्य ती दक्षता विद्यार्थ्यांकडून घेतली जात नसल्यामुळे संभाव्य धोके निर्माण होतात. याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करता यावे,या हेतूने सायबर स्मार्ट स्कूल  या उपक्रमांतर्गत प्रश्न मंजूषा कार्यक्रम घेत जागरुकता घडविण्यात आली.ऑनलाईन असताना कशाप्रकारे काळजी घ्यावी,याबाबत सुरुवातीला शिक्षकांची कार्यशाळा ऑनलाइन घेण्यात आली. त्या नंतर या उपक्रमात सुमारे अठराशे विद्यार्थ्यांना सहभाग करून घेण्यात आले.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सोशल मीडिया सुरक्षा, सायबर बुलिंग, आर्थिक सुरक्षा, सार्वजनिक इंटरनेट, सायबर ग्रूमिंग, यांवर आधारित गोष्टीरूप ऍनिमेशन दाखविण्यात आले. त्यावर आधारित प्रश्नमंजुषेत यशस्वी  विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.ऑनलाइन जगात सुरक्षित राहण्यासाठी प्रायव्हसी सेटिंग कशी बदलावी, हे समजाविण्यात आले.जीओ टॅग, चेक इन, लोकेशन, डेट ऑफ बर्थ, ई-मेल इत्यादी खाजगी माहिती शेअर करू नये. चॅटिंग किंवा गेम खेळताना वेब कॅमचा वापर करू नये. खासगी माहिती अनोळखी व्यक्ती सांगू नये. शारीरिक स्वरूपाची ऑनलाईन  चेष्टा करणे. खोटी ओळख वापरणे. मिम्सद्वारे थट्टा करणे, यांचा सायबर बुलिंग मध्ये समावेश होतो. हे सारे प्रकार थांबवण्याबाबत विद्यार्थ्यांना मुद्देसूद मार्गदर्शन करण्यात आले.
ऑनलाईन सेवा विकत घेण्यापूर्वी व ऑनलाईन पैसे काढताना अथवा पाठवतांना वडीलधा-यांना विचारणे. मोबाइलला मजबूत पासवर्ड देणे, मोबाईल नंबर अनोळखी व्यक्तीस सांगू नये. फ्री वायफाय द्वारे बर्‍याचदा वैयक्तिक माहिती व पासवर्ड चोरीला जाऊ शकतो व एखादा स्पाय व्हायरस सुद्धा पाठवण्यात येतो. एखादा मोठा माणूस लहान मुल बनून ऑनलाईन गप्पा मारतो, त्याला आवडणा-या गोष्टींबद्दल बोलतो, यात मुलांचं नुकसान करणे हा उद्देश असतो,यास सायबर ग्रुमिंग असं म्हणतात. वेब क्राईम व फसवणूक प्रकारात मोडणा-या अशा अनेक बाबींची जागरूकता या  उपक्रमाअंतर्गत घडविण्यात आली.कार्यक्रमाचे संयोजन शाळेतील अटल टिंकरिंग लॅब प्रमुख राजेंद्र मराठे यांनी केले या उपक्रमाला मुख्याध्यापिका सुषमा शाह ,उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक, विद्या सिसोदिया, जगदीश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. उपक्रम यशस्वीतेसाठी संजय सिसोदिया, सुरेखा दाणेज, अनिल शाह, केशव राजभोज, वैभव पाटील, जगदीश वंजारी, गिरीश चव्हाण, शिवाजी माळी, जितेंद्र बारी, हेमंत लोहार, देविदास पाटील व सर्व वर्गशिक्षकांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वराज्यध्वज पूजन मोहिमेची नंदूरबारातील विख्यात याहमोगी मातेच्या चरणी हजेरी, ६ राज्यांतील १२ हजार कि.मी सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास करत दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर होणार प्रतिष्ठापना

Next Post

मा.उपनगराध्यक्ष स्व.राजेंद्रभाऊ माळी यांच्या स्मरणार्थ नंदुरबार नगरपालीकेमार्फत माळीवाड्यात नवीन प्रवेशद्वार बांधकामाचे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add