नंदुरबार l प्रतिनिधी
इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडअंतर्गत घेण्यात आलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर या परीक्षेत पीजी ॲकॅडमीच्या बारावी विज्ञान शाखेचा दिवेश मनोज पाटील या विद्यार्थ्याने यश संपादित करीत महाराष्ट्र व गुजरात या दोन्हीही राज्यांत प्रथम क्रमांक पटकावला. यात त्याला पी.जी. ॲकॅडमीचे शिक्षकवृंद व पी. जी. ॲकॅडमीचे अध्यक्ष ॲड. रुद्रप्रताप रघुवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. पी. जी. ॲकॅडमी नंदुरबार शहरातील नव्हे, तर नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव ॲकॅडमी आहे, ज्यात विद्यार्थी यशस्वी होईल याची खात्री आहे, असे सांगून पी. जी. ॲकॅडमीचे पालक वर्ग यांनी अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.