नंदुरबार | प्रतिनिधी
गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे तर्फे नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात दोन दिवशीय हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेला आज दि.२१ जानेवारी २०२२ पासून सुरुवात आहे. यात राज्यभरातून पंधरा नाट्य संस्थांनी सहभाग घेतला आहे.
नंदुरबार येथे दि.२१ व २२ जानेवारी २०२३ दरम्यान कालकथित जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ दि हस्ती को-ऑप बँक लि. प्रायोजित व रोटरी क्लब ऑफ नंदनगरी सहप्रायोजित हस्ती-जिभाऊ करंडक ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक, अमळनेर, जळगांव, चोपडा, नंदुरबार, अलिबाग, धुळे, डोंबीवल, कल्याण, अंधेरी येथील नाट्यसंस्था सहभागी होणार असून १५ एकांकीकांची नोंद झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज दि.२१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दि हस्ती को-ऑप बँक लि. नंदुरबार शहर शाखाधिकारी नाना हरि कागणे, ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, हस्ती बँकेचे समिती चेअरमन राजेंद्रकुमार चोपडा तसेच मान्यवर म्हणून एस.ए.मिशन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नुतनवर्षा वळवी, डॉ.निखिल संजय चौधरी, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सैय्यद इसरार अली, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, सिने अभिनेता तथा पत्रकार रणजीत राजपूत, जयहिंद इलेक्ट्रॉनिकचे नरेश नानकाणी, अण्णासाहेब पी.के.पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष शितलकुमार पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तर या स्पर्धेचे पारितोषीक वितरण २२ जानेवारी २०२३ रविवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दि हस्ती को-ऑप लि. दोंडाईचाचे चेअरमन कैलास जैन, व्यवस्थापकीय संचालक सतिष जैन, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गावीत तर मान्यवरात एस.व्ही.एन.आय.टी. सुरतचे प्रा.डॉ.शिवानंद सुर्यवंशी, नंदुरबार जि.प.चे उपमुख्य कार्यकारी नंदकिशोर सुर्यवंशी, माजी नगरसेवक संजय चौधरी, ज्येष्ठ पत्रकार तथा नाट्य लेखक रमाकांत पाटील, मंथन डिझाईन्सचे आर्कीटेक्ट निरज देशपांडे, सिने अभिनेता अनिल मोरे, नंदुरबार निमा असोसिएशनचे सचिव डॉ.चेतन चौधरी, निलेश तंवर यांची उपस्थिती राहणार आहे.
या दोन दिवशीय चालणार्या एकांकीका स्पर्धेचे परिक्षण सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री वंदना पंडीत, नाट्य अभिनेता दिग्दर्शक तथा थिएटर्स आर्ट्स विभाग मुंबई विद्यापीठाचे सहा.प्राध्यापक डॉ.प्रदीप सरवदे, नाट्य अभिनेता तथा दिग्दर्शक विश्वनाथ निळे हे मान्यवर करणार आहेत. जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार यंदा छाया संगित साधना विद्यालय, नंदुरबारच्या संचालिका सौ.सुनिता चव्हाण यांना देण्यात येणार आहे.
हस्ती-जिभाऊ करंडक या एकांकीका स्पर्धेतील एकांकीका पाहण्यासाठी कुठलही प्रवेश फी नसून सर्वांना विनामुल्य पाहता येणार आहे. तरी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजन समितीचे नागसेव पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह किरण दाभाडे, जितेंद्र खवळे, राहुल खेडकर, सागर कदम, तुषार सांगोरे, कुणाल वसईकर, रवींद्र कुलकर्णी, एन.टी.पाटील, एस.एन.पाटील, पार्थ जाधव, सुनिल चौधरी, क्षमा वसईकर यांनी केले आहे.
दोन दिवसात सादर होणार्या एकांकीका
दि.२१ जानेवारी शनिवार रोजी दुपारी ११.३० ते १२.३० अवघडीचे पाच दिवस (ओम आर्ट स्टुडीओ, नाशिक), दु.२ ते ३ हायब्रीड (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), दु.३ ते ४ स्त्री जन्म न सुटणारं कोडं (भाग्यदिप थिएटर्स, जळगांव), दु.४ ते ५ पडदा (म.गां.शिक्षण मंडळ कला विज्ञान महाविद्यालय, चोपडा), सायं. ५.३० ते ६.३० ओसामा (एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कुल, नंदुरबार), सायं. ६.३० ते ७.३० पाझर (आकार गृप, नंदुरबार), सायं. ७.३० ते ८.३० स्वप्नांच्या काटेरी वाटा (ओम थिएटर्स, जळगांव), रात्री ८.३० ते ९.३० झुला (अनंत थिएटर्स, पेझारी, ता.अलिबाग, जि.रायगड).
दि.२२ जानेवारी रविवार रोजी स.१० ते ११ भारतीय (मॅड स्टुडीओ, धुळे), स.११ ते १२ झाड, कावळा आणि प्रेयसी (ऍबस्ट्रॅक्ट आर्ट डोंबिवली), दुपारी १२ ते १ ब्लाईंड स्पेस (स्टोरीया प्रॉडक्शन, कल्याण), दु.२ ते ३ ओल्या भिंती (कलासक्त अंधेरी, मुंबई), दु.३ ते ४ द रिंग अगेन (आकार गृप, नंदुरबार), दु.४ ते ५ कंदिल (एम.जे.महाविद्यालय, जळगांव).