म्हसावद l प्रतिनिधी
सुलतानपूर ता.शहादा येथील मुबारकपूर चौफुली ते सुकनदी दरम्यान अज्ञात वाहनाने मोटर सायकल (क्र.MP-46-MP-3049) मोटरसायकलला ठोस दिल्याने मोटरसायकल चालक जागीच ठार झाल्याची घटना 19जानेवारी 2023 रोजी सायंकाळी घडली आहे.
सदर वाहनात कांतीलाल चव्हाण (वय -40) रा आमझिरी ता पानसेमल जि बडवानी हे जागीच ठार झाले. मोटरसायकल चालक अंबापुर येथे त्याच्या साडू कडे जात होते. यावेळीअज्ञात वाहनाने रस्त्यावर भरधाव वेगाने वाहन चालवल्याने वाहनाचे नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्वारास ठोस देत मृत्यूस कारणीभूत ठरल्याने अज्ञात वाहन चालका विरूद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात भादवी कलम 304अ,279,337,427,134, 187 प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाहनाच्या जागोजागी शोध घेण्याच्या प्रयत्न केला असता वाहन मिळून आले नाही.
यावेळी अपघातग्रस्त वाहनाला पोलीस ठाण्यात व चालकाला म्हसावद ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्याला नातेवाईकांना सोपवण्यात आले.या घटनेमुळे रस्त्यांवर आपली वाहने सांभाळून चालवण्याचे आवाहन म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी केले आहे.








