Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे रविवारी मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

team by team
January 20, 2023
in सामाजिक
0
इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे रविवारी मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

नंदुरबार l

येथील इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन, सदा जनसेवा फाऊंडेशन नंदुरबार व हाशमी कमेटी बिल्लीमोरा (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व मुस्लिम समाजबांधवांचा दि.22 जानेवारी  2023 रोजी नंदुरबार शहरात सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील मुस्लिम बांधव येणार असून जोडप्यांचे सामुहिक पध्दतीने विवाह लावण्यात येईल, अशी माहिती इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी पत्रकातून दिली आहे.

याबाबत प्रसिध्दीस पत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील मुस्लिम समाजबांधवांचा सामुहिक विवाह सोहळ्याचे दि.22 जानेवारी 2023 रोजी नंदुरबार येथील बादशाह नगर मैदानात आयोजित करण्यात आले आहे. इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन, सदा जनसेवा फाऊंडेशन नंदुरबार व हाशमी कमेटी बिल्लीमोरा (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या विवाह सोहळ्यास विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व मुस्लिम समाजातील जोडप्यांचे विवाह लावण्यात येतील. तसेच विवाह करणार्‍या जोडप्यांना घरसंसारोपयोगी काही वस्तू भेट म्हणुन देण्यात येणार आहेत.

नंदुरबार शहरातील बादशाह नगर मैदानात व पालिका सभागृहात सामुहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम दि.22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होईल. तसेच दुपारी 12 ते 3 या वेळेत जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटूंबियांचा  वेळ, पैश्याची बचत व्हावी, यासाठी सामुहिक विवाह सोहळा आयोजित केल्याची माहिती इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी दिली आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यात इच्छूक वधु-वरांनी सहभागी होवुन विवाह करावा आणि मुस्लिम समाजबांधवांनी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, उपाध्यक्ष हाजी असलम चौधरी, हाशमी कमेटी बिल्लीमोरा (गुजरात) चे संस्थापक अध्यक्ष मोहतरम सैय्यद पीरबापु हाश्मी, उपाध्यक्ष गनीभाई मेमन, छन्नु पठाण, मुस्तफा चौधरी, नासिर बागवान, शाकिर बागवान, दानिश बागवान, इरफान खाटीक, मकसुद सैय्यद आदींनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीतर्फे हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Next Post

तीन तासात 36 वाहनांवर कारवाई करून 48 हजार रुपयांचा दंड वसूल

Next Post
तीन तासात 36 वाहनांवर कारवाई करून 48 हजार रुपयांचा दंड वसूल

तीन तासात 36 वाहनांवर कारवाई करून 48 हजार रुपयांचा दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add