बोरद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतकरी रमण विठ्ठल पाटील यांच्या खरवड शिवारातील सर्वे नंबर 114 या क्षेत्रफळात ऊस असून जवळच्या क्षेत्रफळात संजय पाटील यांच्या शेतात हरभरा आहे 18 जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान एक बिबट व बिबट मादी तसेच त्यांचे दोन बछडे उसाच्या शेतातून हरभऱ्याच्या शेतात जात असताना रमण विठ्ठल पाटील तसेच त्यांच्या मुलगा विपुल रमण पाटील त्याचबरोबर असलेला रखवालदार यांनी बॅटरी लावून व्हिडिओ काढला त्यात हे बिबटे दिसत होते.
तसा फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी जोरात डरकाळी फोडली तरीही त्यांनी मोठ्या शितापीन बॅटरी लावून फोटो काढला म्हणून या परिसरात मोड, बोरद, कळमसरे, मोहिदा, छोटा धनपूर आदी. भागामध्ये बिबट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल असा अंदाज या परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. अशा ठिकाणी वन खात्याचा अधिकाऱ्यांनी पिंजरे लावून या बिबट्यांना जेर बंद करावे अशी मागणी जोर धरू लागली असली तरी वन खात्याने अद्याप कुठेही पिंजरा लावलेला नाही. म्हणून शेतकरी शेतमजुरांना या बिबट्यांमुळे मोठी दहशत दिसते आहे.रमण पाटील यांच्या शेतात ऊस तोड सुरू होती. म्हणूनच त्यांनी दुसऱ्या शेतात हरभऱ्याच्या शेतात जाण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन दिवसापूर्वी मोड गावालगत अशाच प्रकारचे एक बिबट आणि एक बिबट मादी तसे त्याचे दोन बछडे गावाजवळ येऊन चांगल्या प्रकारे रेतीवर आराम करत बसले होते हे सर्व त्याही वेळेस ग्रामस्थांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट नर व मादी व त्यांचे बछडे यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते आहे म्हणून परिसरात दहशतीचे वातावरण दिसत आहे.