Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खूनाचे ३५ गुन्हे दाखल, २०२२ मध्ये जिल्हयात ९२ टक्के गुन्हयांची उकल

team by team
January 20, 2023
in क्राईम
0
सारंगखेडा मार्गाने होणार्‍या अवजड वाहनांच्या वाहतुकीला ७ ते ३१ डिसेंबर दरम्यान बंदी : पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील

नंदुरबार | प्रतिनिधी

सन २०२२ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत एकुण ६ हजार ८४ गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी ५ हजार ५७८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस दलाला यश आले आहे. दाखल गुन्ह्यांपैकी उघडकीस गुन्ह्यांचे प्रमाण ९२ टक्के आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे गुन्हे शाबितीचे प्रमाणदेखील ३८ टक्के आहे.

 

 

 

सन २०२२ मध्ये नंदुरबार जिल्ह्यात खूनाचे एकुण ३५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ३५ गुन्हे उघडकीस आणण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश आले असून खूनाच्या दाखल गुन्ह्यांपैकी उघडकीस गुन्ह्यांचे प्रमाण १०० टक्के आहे. मालमत्तेविरुध्द्चे दरोड्याचे ०९ गुन्हे दाखल असून सर्व गुन्हे उघडकीस आहेत. तसेच एकुण मालमत्तेविरुध्द्चे ८७३ गुन्हे दाखल असून २४६ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.  ४३ लाख ५४ हजार ५२१ रुपये किमतीची चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दुखापतीच्या २६८ गुन्ह्यांपैकी २६८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

 

 

 

सन २०२२ मध्ये बलात्कार, विनयभंग व इतर महिलांविरुध्द्चे असे एकुण ३३३ गुन्हे दाखल गुन्ह्यांपैकी ३२१ गुन्हे उघडकीस असून त्याचप्रमाणे ९७ टक्के आहे. महिलांविषयक दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची निर्गती करण्यात आलेली आहे. फसवणूकीच्या ४० दाखल गुन्ह्यांपैकी ३७ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

 

 

अवैध दारु, जुगार, गांजा आदी अवैध धंद्यांविरुध्द् देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने सन २०२१ च्या तुलनेत भरीव कामगिरी केली आहे. सन २०२१ मध्ये अवैध दारु, जुगार  आदी अवैध धंद्यांविरुध्द् २३२८ गुन्हे दाखल करुन ३ कोटी ९१ लाख ६७ हजार २६३ रुपये किमतीची दारु, जुगार व इतर साधने जप्त करण्यात आलेली आहेत. सन २०२२ मध्ये २ हजार ५८४ अवैध धंदे करणार्‍यांविरुध्द् गुन्हे दाखल करुन ५ कोटी ८९ लाख ८१ हजार ०३२ रुपये किमतीची दारु, जुगार व इतर साधने जप्त करण्यात आलेले आहेत.  छऊझड कायद्यांतर्गत ०८ गुन्हे दाखल करुन त्यांच्या ताब्यातून ३८ लाख ३२ हजार २२२ रुपये किमतीचा गांजा, अफुची बोंड, चुरा आदी जप्त करण्यात आला आहे.

 

 

 

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्तेविरुध्द्चे गुन्हे करणार्‍या ०१ गुन्हेगारी टोळीतील ०६ व्यक्तींना नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. तसेच दाखल गुन्ह्यातील अटक करण्यात आलेल्या ५ हजार ७४ आरोपीतांविरुध्द् प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे.

 

 

नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दाखल गुन्हे उघड करण्यावर नंदुरबार जिल्हा पोलीस दल भर देत असून, गुन्हेगारीला आळा बसावा याकरीता नंदुरबार जिल्हा पोलीस दल वेगवेगळ्या उपायोजना करीत आहेत. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Next Post

वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, बनावट मेसेजना बळी न पडण्याचे आवाहन

Next Post
मागील वर्षभरात ऑनलाईन फसवणूक झालेले साडे तेरा लाख परत मिळवून देण्यात नंदुरबार सायबर सेलला यश

वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, बनावट मेसेजना बळी न पडण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

January 25, 2026
श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

January 25, 2026
रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

January 25, 2026
राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

January 25, 2026
चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

January 25, 2026
नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

January 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add