शहादा l
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार ‘युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास’ या शिबीराचे उदघाटन झाले.
पुरूषोत्तम नगर येथे झालेल्या उद्घाटनप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमास सातपुडा तापी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक सुपडू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील सखाराम पाटील , खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, पुरूषोत्तम नगरच्या सरपंच सौ. कोकीळाबेन अशोक पाटील उपसरपंच सौ जयश्री मुकेश पाटील, वाल्मिकी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सीमा पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील हे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री.पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनुभव कथन करून आनंदी जीवन जगण्याचे सुत्रे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, इच्छाशक्ती, यासारख्या गुणांचा विकास करून आनंदी जीवन जगावे या विषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. के.पटेल, डॉ.सुशील सिंदखेडकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. वर्षा चौधरी तर आभार प्रा. वजीह अशहर यांनी मानले.








