तळोदा l प्रतिनिधी
उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी हे महाराष्ट्रात आले असतांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली.राज्यपालांचे अपवित्र हात मूर्तीला लागल्याने येथील राष्ट्रवादी तर्फे ब्राह्मणांचा उपस्थितीत जलाभिषेक,दूग्धाभिषेक करून शूद्धीकरण करण्यात आले.
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या वर महाराष्ट्रात दोन तीन दिवसापासून भाजपाकडून तथ्यहीन निषेध नोंदवण्यात येत होता त्या निषेध आंदोलन करत्यांनी आत्मचिंतन करावे जेव्हा त्याच भापजचे खासदार,उपमुख्यमंत्री,जेष्ठ नेते,पदाधिकारी यांच्या कडून वारंवार स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचे अवमान करण्यात आल्यावर ही भाजप ची लोक कोणत्या बिळात होती,याचाच अर्थ असा समजावा की भाजप नेत्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलच्या चुकीच्या वक्तव्यावर आंदोलन कर्त्यांचे ही समर्थन होते? त्याच पाठोपाठ महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला महाराष्ट्राचे कार्यकाळ संपलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गेल्या काही महिन्यावर महाराजांचा दोनदा अपमान करून ही माफी मागितली नसतांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हात लावायचा कोणताही नैतिक अधिकार नसतांना देखील त्यांनी युपीचे मुख्यमंत्री यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन महाराजांना अपवित्र केल्या बद्दल माजी आमदार, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते महाराज सतीशजी जोशी,सोहमजी जोशी,अर्थर्वजी टोपले या तिघी ब्राह्मण देवतेच्या तर्फे पूजा अर्चना व दुग्ध अभिषेक करत शूद्धिधीकरण करून पवित्र करण्यात आले.
यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्षा सौ.अनिता संदीप परदेशीं,तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत,शहराध्यक्ष योगेश मराठे,जिल्हाउपाध्यक्ष रामराव आघाडे,केसरसिंग क्षत्रिय, माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,युवा नेतृत्व संदीप परदेशीं,शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,सरपंच सविता राजपूत,शोभा क्षत्रिय,मोनाली पाडवी,सुनंदा पाडवी,गायत्री खाटीक,युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी, कृ.उ.बा.स.मा.संचालक प्रल्हाद आप्पा फोके,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरीफ शेख नुरा,जिल्हा सरचिटणीस अ.स.से.याकूब सर, सरचिटणीस महेंद्र पोटे,संघटक राहुल पाडवी,शहर उपाध्यक्ष नदीम बागवान,गणेश राणे,अनिल पवार,गणेश पाडवी,भट्या पाडवी,सईद् पठाण,मुस्ताक अली,साबीर मिस्त्री,यु.उ.रा.कॉ.पा अदित्य इंगले,नितीन मराठे मिस्त्री,इमरान शिकलीकर,अमरसिंग वळवी,संजू पाडवी,विष्णू पाडवी,प्रकाश पाडवी,रईस बेलदार सहित कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.








