नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. प्रीती ठाकरे यांच्या स्पर्श नर्सिंग होम या नूतन इमारतीचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. थ्री स्टार हॉटेल सारख्या अनुभव देणाऱ्या सुपर डीलक्स रूम , डीलक्स रूम तसेच गरिबातील गरीब रुग्णास अल्प दरात जनरल वार्ड सुविधा देणारे जिल्हयातील एकमेव हॉस्पिटल आहे.
नंदुरबार येथील डॉ.प्रशांत ठाकरे यांचे स्पर्श नर्सिंग होम गेल्या अनेक वर्षांपासून तलाठी कॉलनीत सुरू होते. डॉ.ठाकरे यांची उपचार पध्दतीमुळे ते अल्पावधीतच नावारूपाला आले.आज ते जिल्ह्यातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आहेत.दि.1 जानेवारी रोजी नूतन वर्षाचे औचित्य साधत विरल विहार येथील प्लॉट नं.23 येथे नूतन इमारतीचे उद्घाटन सुरत मनपाचे माजी नगरसेवक डी .एम .वानखेडे, रि. व.अभियंता नंदुरबार डी.व्ही.ठाकरे, श्री.मराठे यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्श हॉस्पिटल सुविधा
थ्री स्टार हॉटेल सारख्या अनुभव देणाऱ्या सुपर डीलक्स रूम , डीलक्स रूम तसेच गरिबातील गरीब रुग्णास अल्प दरात जनरल वार्ड सुविधा,वंधत्व समस्या साठी सुविधा असणारे स्पर्श हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे. यावेळी खा.डॉ. हीना गावित ,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी जिल्हा प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पुष्पाताई बोंडे, नगरसेवक चारुदत्त काळवणकर, कैलास पाटील, श्री .वसईकर यांच्यासह विविध क्षेश्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटी देत तसेच फोन वरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ.प्रशांत ठाकरे (MBBS , D G O) प्रसूतीतज्ञ तथा स्री रोग तज्ञ लॅप रोस्कोपिक सर्जन, प्रजनन सल्लागार. डॉ.प्रीती ठाकरे, बीडीएस डेंटल सर्जन समुपदेश तज्ञ, डॉ.ऐश्वर्या ठाकरे, बीडीएस डेंटल सर्जन यांनी शुभेच्छा स्विकारलल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी उपस्थीती होती.
नंदुरबार शहरात अनेक वर्षांपासून स्पर्श नर्सिंग होम
हॉस्पिटल व्दारे रूग्णांची सेवा करीत असुन यापुढेही रूग्णांना थ्री स्टार हॉटेल सारख्या अनुभव देणाऱ्या सुपर डीलक्स रूम , डीलक्स रूम तसेच गरिबातील गरीब रुग्णास अल्प दरात जनरल वार्ड सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचा मानस डॉ.प्रशांत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.