नंदुरबार l प्रतिनिधी
व्हॉईस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आज दि. ०६ जानेवारी २०२३ रोजी प्रतिमा पूजनासह पत्रकार दिनानिमित्त विमा पॉलिसीचे वितरण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्ह्यातर्फे करण्यात आले आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया ही देशातील पत्रकारांसाठी काम करणारी संघटना आहे लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीच्या या उद्देशाने ही संघटना काम करते दिनांक ६ जानेवारी हा दिवस आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पत्रकार दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आज दि. ६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालयात प्रतिमा पूजनासह विमा पॉलिसीचे वितरण व आरोग्य शिबीर होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार सूर्यभान राजपूत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, योगेंद्र जोशी हे उपस्थित राहतील. प्रतिमा पूजन व विमा पॉलिसी वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर नंदुरबार शहरातील डॉ. नूतन शहा यांच्या श्रीजी हॉस्पिटलमध्ये दुपारी ४ ते ६ या वेळेत व्हॉईस ऑफ मीडिया व लायन्स क्लब, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. या कार्यक्रमाला नंदुरबार शहराचा जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष धनराज माळी, सरचिटणीस राकेश कलाल व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.








