नंदुरबार l
नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथे बसस्टॅण्डजवळ ऊसाने भरलेला ट्रक उलटून नुकसान केल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील बसस्टॅण्डजवळ एका ऊसाने भरलेल्या मालट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक (एम.एच.०४ सीजी ५०८६) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रक चालवून घेवून असतांना वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून नुकसान झाले.
तसेच अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत पोहेकॉ.पितांबर जगदाळे यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात मालट्रक चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १९८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.कैलास मोरे करीत आहेत.








