म्हसावद l प्रतिनिधी
पुणे येथे आयोजित मिनी ऑलिंपिक वुशू स्पर्धेसाठी पंच म्हणून नंदुरबार येथील रामा मधुकर हटकर यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ते १२ जानेवारी दरम्यान पुणे येथे होणाऱ्या मिनी ऑलिंपिक वुशू स्पर्धा आयोजित होणार आहे या स्पर्धेसाठी पंच म्हणून रामा हटकर यांची निवड करण्यात आली आहे .निवड झाल्याबद्दल जिल्यातील शुभेच्छुक म्हणून आशिष कडोसे ,किरण मिस्त्री, तुषार सोपनार ,आदर्श कडोसे, गजेंद्र सुळ, व आदर्श स्पोर्ट्स अकॅडमी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








