शहादा l प्रतिनिधी
जीवन साधना विद्या प्रसारक मंडळ लोणखेडा संचलित माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना पाटील या होत्या. त्यांनी प्रतिमा पूजन केले. आपल्या मनोगतात सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या अथक प्रयत्नांनी स्री शिक्षणाचा पाया रचला गेला.यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावरील नाटिका सादरीकरण केले.
तसेच श्रीमती शुभांगी पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सूत्रसंचालन श्रीमती मनीषा पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास शुभांगी पाटील,सचिन बागले मिलिंद पगारे,हर्षल चौधरी,प्रवीण मोरे, छोटू सोनवणे, सिद्धार्थ सामुद्रे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








