नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाण्याच्या चेअरमनपदी भरत माणिकराव गावित तर व्हाइस चेअरमनपदी जगन चंद्रा कोकणी यांची बिनविरोध निवड झाली.

डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक २४ डिसेंबरला झाली होती .यात परिवर्तन पॅनलचे चौदा सदस्य निवडून आले तर शेतकरी विकास पॅनलचे दोन बिनविरोध व एक निवडून असे तीन सदस्य आले होते.नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया दि ४ बुधवारी कारखान्याच्या सभागृहात झाली.सकाळी अकराला निवडणूक निर्णय अधिकारी भारती ठाकूर, रत्ना मोरे व नीरज चौधरी यांच्या उपस्थितीत चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. चेअरमन पदासाठी परिवर्तन पॅनलचे भरत माणिकराव गावित व व्हाइस चेअरमन पदासाठी जगन चंद्रा कोकणी या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यात चेअरमनपदी भरत गावित तर व्हाइस चेअरमनपदी जगन कोकणी यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

यावेळी राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा. डॉ. हिना गावित, इगतपुरीचे माजी आमदार निर्मला गावित,माजी आमदार शरद गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी चेअरमन भरत माणिकराव गावित तर व्हाइस चेअरमन जगन चंद्रा कोकणी यांना शुभेच्छा दिल्यात यावेळी. नवनिर्वाचित संचालक संगीता गावीत,बकाराम गावीत,रमेशचंद्र राणा, हरिदास गावीत,आलु गावीत,देवराम गावीत,रमेश गावीत,लक्ष्मण कोकणी,रावजी वळवी ,रुद्राबाई वसावे,मीराबाई गावीत, सीताराम ठाकरे ,उपस्थित होते.नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.त्या नंतर माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या निवासस्थानी जाऊन नवनिर्वाचीत चेअरमन भरत गावीत यांनी भेट घेऊन आर्शिवाद घेतला.








