नंदुरबार l
तालुक्यातील भादवड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाचा खेळाडू निलेश दादाभाई पाटील याची १६ वर्ष मुले या वयोगटातील गोळा फेक या क्रीडा प्रकारात ९.१० मीटर गोळा फेक करून प्रथम क्रमांक पटकावत पटणा (बिहार) येथे होणार्या १८ व्या राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनिअर ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निलेश पाटील या खेळाडूला शाळेचे क्रीडा शिक्षक भरत चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
दि.१२ ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान पटना (बिहार) येथे होणार्या १८ व्या राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनिअर ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड चाचणी २८ डिसेंबर २०२२ रोजी नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. या निवड चाचणीत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवड या शाळेचा खेळाडू निलेश दादाभाई पाटील याचे १६ वर्ष मुले या वयोगटातील गोळा फेक या क्रीडा प्रकारात ९.१० मीटर गोळा फेक करून प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या खेळाडूला व शाळेला ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळेचे माजी विद्यार्थी सुनील पाटील व तुषार वाघ यांच्यावतीने शाळेला लोखंडी गोळा भेट दिला. सत्कार समारंभात शाळेचे मुख्याध्यापक जी.एन.परदेशी, वरिष्ठ शिक्षक एस.के.पाटील, वरिष्ठ शिक्षिका सी.एच.वाघ, टी.जी.पाटील, एम.बी.बोरसे, एम.बी.शिंदे, एच.एस.साळुंखे, श्रीमती व्ही.के.गिरासे, डी.ए.चौधरी, सी.एस.पाटील, कुवर नाना, अनिल भिल आदी उपस्थित होते. निवड झालेल्या मुला-मुलींचा संघ पटना बिहार येथे सहभागी होऊन नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.








