शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शहादा येथे गट व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली.
गट व्यवस्थापन समिती सभेला नायब तहसीलदार श्री.नांदोडे, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील ,गट शिक्षणाधिकारी श्री.वळवी,शिक्षण विस्तार अधिकारी ममता पाटील, वैद्यकीय अधिकारी पाडळदा केंद्र डॉ.सामुद्रे,केंद्रप्रमुख श्री.लामगे,विषय तज्ञ हेमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापिका नीलिमा पाटील व गृह प्रमुख मनीषा पाटील उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींना स्वेटर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. गट व्यवस्थापन सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सभा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारींनी परिश्रम घेतले.








