नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरात शहर पोलीस ठाण्यातर्फे नायलॉन मांजा विक्री करणार्या अवैध विक्रेत्यावर कारवाई करीत ३ हजार १२० रुपये किमतीचे नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.नंदुरबार जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री, साठवणुक किंवा हाताळणी करणार्यांवर देखील कारवाई करण्याचा ईशारा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला.
नंदुरबार जिल्हा लगत असलेल्या गुजराज राज्यासह संपुर्ण भारतात मकरसंक्रांतीचा पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पतांगोत्सावाचा आनंद घेण्यासाठी लहानांपासुन थोरल्यांपर्यंत सर्वच नागरिक घेत असतात. जिल्ह्यतील विविध शहरांमध्ये पतंग व मांजा विक्रेत्यांनी आप-आपली दुकाने मांडलेली असतात. पतंगोत्सव साजरा करतांना डी.जे. व स्पिकर लावुन मोठ-मोठ्याने गाणे लावुन नृत्य करतांना आपण बघत असतो, परंतु सण साजरा करुन आपली संस्कृती टिकवत असतांना पर्यावरणाची काळजी व सांभाळ करणे हे देखील सर्व सामान्य नागरीकांचे एक कर्तव्य आहे. पतंगोत्सव साजरा करतांना नायलॉन मांजा वापरामुळे निसर्गातील बरेच पशु, पक्षी वेळप्रसंगी लोकांना दुखापत होवुन आपला जिव देखील गमवावा लागला आहे, असे अनेक उदाहरण आपण वर्तमानपत्र किंवा प्रसारमाध्यमांद्वारे बघत असतो. अशा प्रकारच्या पतंग उडविण्याच्या धाग्यामुळे प्राणघातक इजांपासुन पक्षी व मानव जिवितांस सरंक्षण करण्याची गरज आहे. अशा दुर्मिळ व नष्टप्राय होत असलेल्या निष्पाप पक्षांचे सरंक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.
२८ डिसेंबर २०२२ रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरात जळका बाजार परिसरात डॉ. शर्मा यांच्या हॉस्पीटलच्या शेजारी असलेल्या बोळीत एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा / दोर्यांची विक्री करीत आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कळवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाने सदर ठिकाणी जावून खात्री केली असता जळका बाजार परिसरात डॉ. शर्मा यांच्या हॉस्पीटलच्या शेजारी असलेल्या बोळीत एक इसम त्याच्या हातात पांढर्या रंगाची कापडी पिशवी घेवून असलेला नायलॉन मांजाची विक्री करीत असतांना मिळून आल्याने नितीन प्रकश छत्रिय रा. चौधरी गल्ली, नंदुरबार यास अटक करून त्याच्या ताब्यातुन ३ हजार १२० रुपये किमतीचे ६ नग मोनो, स्काय, नींजा नायलॉन मांजा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७९७/२०२२ भा.द.वि. कलम ३३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पतंग उडवितांना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जिवीत हानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक महेश माळी, पोलीस हवालदार सुनिल मोरे, पोलीस शिपाई श्रीकांत पाटील, शैलेंद्र माळी, राहुल पांढारकर, अफसर शहा यांच्या पथकाने केली आहे.
प्लॅस्टीक किंवा तर कृत्रीम वस्तूपासुन बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याचा सणाच्या वेळी बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच नायलॉन मांजाची किरकोळ विक्री किंवा प्रमुख विक्रेत्याचा शोध घेवुन त्यांच्यावर पर्यावरण (सरंक्षण) अधिनियम १९८६ च्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल. त्याचप्रकारे ज्या वस्तूंपासून पर्यावरणास हानी पोहचेल असेल असे नायलॉन मांजाची विक्री, साठवणुक किंवा हाताळणी करणार्यांवर देखील कारवाई करण्यात येईल तसेच नायलॉन मांजा विक्री व हाताळणी करतांना आढळुन आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार ०२५६४-२१०१००/ २१०११३ यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.








