शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विविध खेळातील नैपुण्य प्राप्त खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 19 वर्षा आतील मुले व मुली सॉफ्टबॉल, बेसबॉल व नेटबॉल स्पर्धेत विजय मिळवल्या बद्दल खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील , क्रीडा उपंचालक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती के. के. पटेल, उपप्राचार्य डॉ. एम. के, पटेल, पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश, प्रा. व्ही. सी. डोळे, तालुका क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, प्रा. डॉ. मयूर ठाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लिपिक मुकेश बारी, महेंद्र काटे, क्रीडा संचालक प्रा. डॉ अरविंद कांबळे व प्रा.जितेंद्र माळी उपस्थित होते.
शिक्षण व तंत्रज्ञानाच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य व स्वास्थ चांगले राहणे आवश्यक आहे. आरोग्य व स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी मैदानाशी दैनंदिन नाळ जोडलेली असलेली पाहिजे.तेव्हाच शारीरिक व मानसिक विकास होतो असे मार्गदर्शन प्रा. मकरंद पाटील यांनी केले व पुढील स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.पाटील व प्राचार्य डॉ.पाटील यांनी मार्गदर्शन केले.