शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात ‘आरोग्य व नियमित आहार’ या विषयावर शहादा येथील आदित्य हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मेघना पटेल यांचे व्याख्यान संपन्न झाले.
महाविद्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. कल्पना पटेल होत्या. यावेळी बोलतांना डॉ. पाटील म्हणाल्या, उत्तम आरोग्यासाठी सकस आहार व व्यायाम गरजेचा आहे. शिक्षणाबरोबरच आरोग्य ही आपली संपत्ती आहे. उत्तम आरोग्यासाठी सकस व प्रथिनयुक्त आहार गरजेचा आहे. अनेकदा महाविद्यालयीन युवती डायटच्या नावाखाली अर्धपोटी असतात. ही बाब आरोग्यासाठी धोकेदायक आहे.
पालकांनीही आपल्या पाल्यांच्या उत्तम आरोग्याकडे लक्ष असू द्यावे.अध्यक्षीय समारोपात प्रा.पटेल यांनी विद्यार्थ्यीनींनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.व्ही.सी. डोळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.योगिता पाटील यांनी केले तर आभार प्रा. उदय पटेल यांनी मानले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश यांच्यासह सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.