नंदुरबार l
नंदुरबार येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्याविषयी माहिती देवुन पक्ष संघटन मजबुत करण्यावर चर्चा झाली.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 138 वा वर्धापन दिन कार्यक्रम नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला. नंदुरबार येथील जिल्हा काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पाटील होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.अशोक पाटील, उत्तर महाराष्ट्र सचिव देवा चौधरी, राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस पंडीतराव पवार, माजी नगरसेवक ईकबाल खाटीक, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वाजिद सैय्यद, ज्येष्ठ कार्यकर्ते मुस्लिम कुरेशी, दत्तु पवार, खंडू पवार, काँग्रेस रोजगार-स्वयंरोजगारचे शहराध्यक्ष रऊफ शाह,
तैय्यबा शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सुभाष पाटील, एजाज बागवान, राजेंद्र पाटील, पंडीत पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यासह भारत जोडे यात्रेविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. आभार काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.