नंदूरबार l प्रतिनिधी
गावाकडून तळोदा येथे परतत असताना पहाटे दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, तळोदा येथे राहणारे ॲड.निलेश वसावे ये त्यांच्या चिवलउतार ता.अक्कलकुवा येथे काल दि.२७ डिसेंबर रोजी गेले होते.आज सकाळी ॲड.निलेश वसावे व हांजा रूपा वसावे यांच्या ताब्यातील होन्डा कंपनीची शाईन मोटार सायकल (क्रं.MH.39AG.2552) ईच्यावर चिवलउतार येथून तळोदा येथे परतत असताना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास भवर ता.तळोदा गावाजवळ अज्ञात वाहनावरील चालक नाव गांव माहित नाही यांने अविचाराने व हयगयीने रस्त्याच्या परिस्थीती कडे दुर्लक्ष करून त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन होन्डा कंपनीची शाईन मोटार सायकल धडक दिली.
या अपघातात ॲड. निलेश पारता वसावे (वय 36 वर्षे) रा. चिवलउतार ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार ह.मु. विदयानगरी तळोदा, हांजा रुपा वसावे (वय 34 वर्षे ) रा. वेली ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार ह.मु. विदयानगरी तळोदा या दोघांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी आसुबाई भ्र.निलेश वसावे रा. चिवलउतार ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार ह.मु. विद्यानगरी, तळोदा ता. तळोदा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालक विरुद्ध भा.दं.वि.क. 304 (अ), 279, 337, 338, 427, MV act
184, 134, 187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोनि पंडितराव सोनवणे करीत आहेत.दरम्यान या अपघाता नंतर एकच शोककळा कोसळली.दरम्यान ॲड. निलेश पारता वसावे हे अक्कलकुवा न्यायालयात काम पाहत होते.








