नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील तलवाडे बु. शिवारातील शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमधून ७ क्विंटल कापूस अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील तलवाडे बु. येथे राहणार्या गुलाब प्रकाश पाटील यांच्या शेतात बंदीस्त पत्रीशेड मधून अज्ञात चोरटयांनी ७० हजार रूपये किंमतीचा १० क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी गुलाब प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयविरूध्द भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक आनंदा मोरे करीत आहेत.








